वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
तीस वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन गॅरी कास्पारोव्हने क्लच चेस लिजंड्स स्पर्धेच्या 10 व्या गेममध्ये विश्वनाथन आनंदला हरवले आणि दोन गेम शिल्लक असताना सामना जिंकला.
1995 मध्ये 10 ऑक्टोबर रोजी आनंदला न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 107 व्या मजल्यावर कास्पारोव्हविऊद्धच्या 20 गेम्सच्या क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यात 18 व्या गेममध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले होते आणि 7.5-10.5 असा पराभव पत्करावा लागला होता. नियमांनुसार, विद्यमान लढतीतीतल ब्लिट्झ टाइम कंट्रोलच्या अंतर्गत शेवटचे दोन गेम तरीही खेळले गेले आणि आनंदने थोडे उशिरा पुनरागमन करत दोन विजय मिळवले. शेवटी गुणसंख्या 13-11 अशी झाली. कास्पारोव्हने 78,000 अमेरिकन डॉलर्स जिंकले, तर आनंदने 1,44,000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे असलेल्या सामन्यात 66,000 अमेरिकन डॉलर्स जिंकले.
सामन्यात पाच गुणांनी आघाडी घेतलेली असताना कास्पारोव्हला माहित होते की, आनंदला अजूनही सामना जिंकण्याची संधी आहे. कारण शेवटच्या दिवशी 12 गुण पणाला लागले होते आणि प्रत्येक विजयाचे मूल्य तीन गुण होते. आनंदने दिवसाची सुऊवात कठीण बरोबरीने केली आणि नंतर दुसऱ्या गेमच्या सुऊवातीलाच आघाडी घेतली. तथापि, कास्पारोव्हने स्वत:ला शर्यतीत ठेवले आणि आनंदने केलेली चूक त्याला महागात पडली. खेळाच्या शेवटच्या टप्प्यात त्याने लढत गमावली.
कास्पारोव्हने दोन ब्लिट्झ गेम्स, शिल्लक असताना सामना जिंकला. त्यानंतर आनंदची परतफेड करण्याची पाळी येऊन त्याने दोन्ही गेम जिंकत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत पुनरागमन केले. कास्पारोव्ह नंतर म्हणाला की, तो हा सामना जिंकण्याची अपेक्षा करत नव्हता. परंतु त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या हवेमुळे तो खूश आहे.









