13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमी संघाने सीसीआय संघाचा 4 गडय़ांनी तर दुसऱया सामन्यात आनंद अकादमी अ ने ब संघाचा 10 गडय़ांनी पराभव केला. अथर्व एम. व हैदरअली यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमी ब संघाने 15.5 षटकात सर्व बाद 51 धावा केल्या. रोहनने 10 धावा केल्या. आनंद अ तर्फे अथर्व करडीने 2 धावात 3 तर अथर्व एम.ने 2 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी अ ने 7.2 षटकात बिनबाद 52 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. पृथ्वीने नाबाद 17 तर अथर्वने नाबाद 16 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने 25 षटकात 6 बाद 147 धावा केल्या. झोया काझीने 56 तर श्रेया पोटेने 48 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे समर्थने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 22 षटकात 6 बाद 130 धावा केल्या असताना पावसाने हजेरी लावल्याने धावसरासरीवर आनंद अकादमीला विजयी घोषित करण्यात आले. हैदरअलीने 45 तर अथर्वने 24 धावा केल्या. सीसीआयतर्फे वरदराजने 2 गडी बाद केले.









