वार्ताहर / कुडाळ
तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 7 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता पुराण वाचन, 10 वाजता पालखी सोहळा, 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थितीत राहावे, असे आवाहन अनलादेवी ग्रामस्थ मंडळाने केले आहे.









