वृत्तसंस्था/ टोरँटो
96,250 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या येथे सुरु असलेल्या पीएसए सिल्व्हर कॅनेडीयन महिलांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. दिल्लीची अनाहत सिंग ही जागतिक महिला स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत 43 व्या स्थानावर आहे.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात अनाहत सिंगने स्वीसच्या सिंडी मेर्लोचा केवळ 17 मिनिटात 11-3, 11-3, 11-4 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनाहत सिंगचा पुढील फेरीतील सामना सहाव्या मानांकित मेलिसा अल्वेस बरोबर होणार आहे.









