वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम (इंग्लंड)
येथे झालेल्या ब्रिटिश खुल्या कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटात भारताची स्क्वॅशपटू अनाहत सिंगने उपविजेतेपद पटकाविले. या गटात इजिप्तच्या नेडियन इलहेमेमीने अजिंक्यपद मिळविले.
अनाहत आणि नेडियन यांच्यात ही अंतिम लढत 68 मिनिटे रंगली. या लढतीत नेडियनने अनहातचा 3-2 असा पराभव केला. गेल्या वर्षी अनाहतने स्क्वॉटीश कनिष्ठांच्या खुल्या गोल्फ स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षाखालील गटातील जेतेपद मिळविले. तसेच तिने दोन वेळेला वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने मिश्र दुहेरीत आणि सांघिक प्रकारात कांस्यपदके मिळविली होती. बर्मिंगहॅममधील स्पर्धेत मुलांच्या 15 वर्षाखालील गटात भारताच्या आर्यवीर दिवानने तिसरे स्थान मिळविले.









