वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडातील टोरॅन्टो येथे सुरू असलेल्या कॅनेडीयन खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू आणि विद्यमान राष्ट्रीय विजेती अनाहत सिंगने फ्रान्सच्या मेलिसा अल्व्हेसचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
दिल्लीच्या 17 वर्षीय अनाहत सिंगने फ्रान्सच्या सहाव्या मानांकीत अल्व्हेसचे आव्हान 12-10, 12-10, 8-11, 11-2 अशा गेम्समध्ये 41 मिनिटांच्या कालावधीत संपुष्टात आणले. अनाहत सिंगचा पुढील फेरीतील सामना बेल्जियमच्या द्वितीय मानांकीत टिने गिल्सबरोबर होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वीर छोत्रानीला मात्र इंग्लंडच्या पेरी मलिककडून पराभव पत्करावा लागला.









