वृत्तसंस्था / नवी दिल्ली
15000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या बोस्टन खुल्या पीएसए चॅलेंजर स्पर्धेत भारताची विद्यमान राष्ट्रीय विजेती अनाहत सिंगने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या चार्लोट सीझेचा पराभव केला. अनाहत सिंगने सिझेचा 11-4, 11-6, 9-11, 11-8 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत अनाहत सिंगला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दिल्लीच्या अनाहत सिंगचा पुढील फेरीतील सामना इजिप्तच्या जेना स्वेफायशी होणार आहे.









