वृत्तसंस्था/होस्टन
येथे सुरू असलेल्या विश्व कनिष्टांच्या स्क्वॅश चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंग आणि शौर्य बावा यांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
16 वर्षीय अनाहत सिंगने जपानच्या मिडोरीकेवाचा 11-6, 13-11, 11-2 अशा गेम्स्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आता अनाहतचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इजिप्तच्या नेडीयन इलामेमीबरोबर होईल. मुलांच्या विभागात शौर्य बावाने अर्जेंटिनाच्या पोर्टबेल्सवर 11-9, 5-11, 11-5, 13-11 अशा गेम्स्मध्ये मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता शौर्य बावाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मलेशियाच्या सेरनशी होणार आहे.









