खेड :
महाड – दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुणे (पिंपरी चिंचवड) आगाराची पुणे – फौजी अंबवडे एसटी पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर मांडवकर कोंडनजीक घसरली. या अपघातात चालक-वाहकासह आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी महाड ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
जखमींमध्ये एसटी चालक अविनाश पांडुरंग लोखंडे (34, पिंपरी चिंचवड), वाहक पौर्णिमा प्रमोद होन कडसे (46, पुणे), आशाबाई नारायण जाधव (75), शारदा गजानन शेलार (67), सोहम ज्ञानेश्वर पवार (17, फौजी अंबवडे), सिमाब सिकंदर पेडेकर (16), सलवा अब्दुल सलाम पेडेकर (17 रा. शिरवली), आराधना दिगंबर पवार (18, फौजी अंबवडे), लहू सखाराम पाते (55, पांगरी), विश्वजीत सोपान कदम ( 27) यांचा समावेश आहे.
चालक अविनाश लोखंडे हे पुणे (पिंपरी चिंचवड) आगाराची पुणे – फौजी अंबवडे एसटी (क्र. एमएच 07 सी 9043) घेऊन जात असताना मांडवकर-कोंडनजीक घसरली. अपघातानंतर प्रवाशांचा भीतीने थरकाप उडाला. अपघाताची माहिती मिळताच शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना महाड ग्रामीण ऊग्णालयात दाखल केले. एसटी महामंडळामार्फत किरकोळ जखमींना अर्थसहाय्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले.








