वारणानगर / प्रतिनिधी
येथील वारणा पाईप कारखान्या समोरील विक्रम पाटील यांच्या शेतातील विहरीत पाय घसरून पडल्याने वृध्द महिलेचा मृत्यू झाला. श्रीमती यशोदा दत्तात्रय कोळी रा. वारणानगर असे वृध्द महिलेचे नांव आहे. यशोदा कोळी यांचा मृतदेह विहरीत दिसल्यावर कोडोली पोलीसांना विक्रम पाटील यानी कळवले. कोळी यांची कन्या शशिकला संकपाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
यशोदा कोळी यांच्या मेंदूला रक्त पोहचत नसल्याने त्यांची समज गेली होती. त्या दिवसभर भटकत असायच्या. त्यांच्या कुटुंबात चार मुली व एक मुलगा असून मुलासही पक्षाघाताचा झटका आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड यांनी सांगीतले.