रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील मारूती मंदीर-मजगांव रस्त्यावरील गोडबोले स्टॉप जवळ असलेल्या गटारात पडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. जनार्दन यशवंत वालावलकर (63, रा. मजगांवर रोड रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन हे 2 मार्च 2023 रोजी दुपारी 12 च्या सुमारास मजगांव रोडने मारूती मंदीर परिसरात फिरण्यासाठी जात होत़े यावेळी अचानक ते गोडबोले स्टॉप रस्त्याकडेला असलेल्या गटारामध्ये पडल़े या घटनेत जनार्दन यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल़ी स्थानिक लोकांनी जनार्दन यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनार्दन यांना तपासून मृत घोषीत केल़े याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.









