गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज – वडरगे रोड वरील विद्यानगर येथे राहणारा सुरज महादेव खोत (वय २७) या आयटी इंजिनिअर ने घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत नैराश्यातून आत्महत्या केली आहे. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.
सुरज हा पुण्यातील नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. कोरोना नंतर वर्क फ्रॉम होम असल्याने तो आपल्या घरातूनच काम करत होता. नेहमी मित्रमंडळीच्या गराड्यात असणाऱ्या सुरजने सोमवारी मध्यरात्री नैराश्यातून घरातील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खोत कुटुंबियाला जबरदस्त धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत या घटनेची नोंद पोलिसात दाखल झाले आहे. इंजिनिअर सुरज हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे.









