स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या एका बेटाला 85 वर्षांमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी नोंदणीकृत करण्यात आले आहे. स्कॉटलंडच्या या बेटाला टोर्सा आयलँड या नावाने ओळखले जाते. टोसा बेट आयलँड्सपैकी एक असून जे सामूहिक स्वरुपात एक बेटसमूह तयार करतात. टोर्सा बेटावर एक ऐतिहासिक महालवजा फार्महाउस देखील आहे. हायलँडमधील स्कॉटिश समुदाय मॅकलीनकडे या टॉवर हाउसची मालकी होती. मॅकलीन हायलँड्समधील पहिल्या वंशांपैकी एक होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी होती. टोर्सा या नावाचा अर्थ थोरचे बेट असा होतो. या बेटावर तीन बेडरुम्स असलेले ऐतिहासिक फार्महाउस असून त्यातून समुद्राचे सुंदर दृश्य पाहता येते. या बेटावर हरिण, ससे, सागरी पक्षी आणि अन्य अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात.
स्निप, वुडकॉक, बदक आणि गीज यासारखे जंगली पक्षी या बेटाला आकर्षक स्वरुप देत असल्याच्या विक्रीच्या यादीत नमूद आहे. स्कॉटिश बेट म्हणून टोर्सा एक दुर्लभ स्थान असून जे पूर्णपणे शांतता अन् गोपनीयता इच्छिणाऱ्या लोकांसाठी मोठा आनंद मिळवून देणार असल्याचे वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. या बेटावरून स्कॉटलंडमध्ये पोहोचणे देखील अत्यंत सोपे आहे. या बेटाचा वापर गुरांच्या पालनासोबत शेतीसाठी देखील केला जात आहे. टोर्सा फार्महाउसचा वापर हॉलिडे हाउस म्हणून देखील केला जातो. या बेटाची किंमत 19 लाख डॉलर्स म्हणजेच 15.79 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. लंडनमधील अनेक घरांची किंमत याहून अधिक असेल. भारतात मिळणारी सर्वात महागडी कार बुगाटी वेरॉनपेक्षा हे बेट स्वस्त आहे. वेरॉनची किंमत भारतात 16 कोटी रुपये इतकी आहे. टोर्सा एलेनाबेइचपासून ऑइल ऑफ सेलवर केवळ एका छोट्या नौकेतून पोहोचता येतो. ऑइल ऑफ सेल एक मध्ययुगीन पूलाद्वारे मुख्य भूमीशी जोडलेले आहे. बेटाच्या दक्षिण दिशेला नौका अन् मोटरबोट्ससाठी एक जेटी आहे. पश्चिम किनाऱ्यावरील दृश्य अत्यंत मोहक असल्याचे सांगण्यात आले.