प्रतिनिधी/ बेळगाव
बुलकच्या बैठकीमध्ये अनघा वैद्य यांनी समांतर या सुभाष शिरवळकर यांच्या कादंबरीचा परिचय करून दिला. एकसारखी दिसणारी दोन माणसे असू शकतात. वयात 30 वर्षे फरक असूनही दोन भिन्न माणसांचे भविष्य व भूतकाळातील घटना या एकसारख्या असू शकतात आणि या व्यक्ती एकमेकांस कशा भेटतात या मध्यवर्ती सूत्रावर शिरवळकर यांनी ही कथा गुंफली आहे.
आपला हात दाखवून भविष्य जाणून घेण्यासाठी हस्तसामुद्रिक जेव्हा आपण असाच हात यापूर्वीही पाहिला होता असे कुमार महाजन यांना सांगतो तेथून ही अद्भुत कथा सुरू होते. कुमार यांच्या बरोबरच सुदर्शन चक्रपाणी ही दुसरी व्यक्तीरेखा आहे. कथेतील अन्य व्यक्तिमत्त्वे, जंगल, पाऊस, हवेली अशी गुढता वाढविणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.









