जून महिन्यात 4.31 टक्क्मयांवरून 4.81 टक्के , भाज्या-खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीपीआय आधारित किरकोळ महागाई दरात जून 2023 मध्ये वाढ नोंदवली गेली आहे. मे महिन्यात 4.31 टक्क्यांवर असलेला महागाई दर जूनमध्ये 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे किरकोळ महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये शहरी महागाई 4.33 टक्क्यांवरून 4.96 टक्क्यांपर्यंत वाढली तर ग्रामीण चलनवाढ 4.23 टक्के वरून 4.72 टक्के झाली. या महिन्यात मुख्यत्वेकरून अन्नधान्य महागाई 2.96 टक्क्यांवरून 4.49 टक्क्यापर्यंत वाढल्याचा परिणाम किरकोळ महागाई दरावर झाला आहे.
जून महिन्यात अन्नधान्य महागाईबरोबरच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांचा महागाई दर -8.18 टक्क्यांवरून 0.93 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे, वीज इंधन महागाई मेच्या तुलनेत जूनमध्ये 4.64 टक्क्यांवरून 3.92 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील किरकोळ महागाई 4.84 टक्क्यांवरून 4.56 टक्के झाली आहे.
औद्योगिक उत्पादनात सुधारणा
मे महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन 5.2 टक्क्मयांनी वाढले आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आधारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्यावर्षीच्या मे महिन्यात तुलनेत 19.7 टक्क्मयांनी वाढले आहे. खाण क्षेत्रातील उत्पादन 6.4 टक्क्यांनी आणि वीजनिर्मिती 0.9 टक्क्यांनी वाढल्याने अंतिम आकडेवारीतून दिसून येत आहे.









