काँग्रेसच्या सुकाणू समितीने शुक्रवारी सर्वानुमते पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या कार्य समितीच्या Working Commiti च्या सर्व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार दिले आहेत. अध्यक्ष खरगे यांच्या अध्यक्षतेखाली रायपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या कॉंग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस कार्यकारिणी (CWC) ची जागा घेतलेल्या सुकाणू समितीने, 85 व्या अधिवेशनाच्या सत्राच्या सुरुवातीलाच चर्चा सुरू केली. तीन दिवसीय मेळाव्याच्या अजेंड्याला मंजुरी दिली. असे सूत्रांनी सांगितले.
समितीने सर्वानुमते पक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना CWC सदस्यांना नामनिर्देशित करण्यासाठी अधिकृत करण्याचा निर्णय घेतला, असे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले. महिला, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि तरुणांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









