कोल्हापूर :
केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने’ अंतर्गत ‘मॉडेल सोलर गाव’ (आदर्श सौर ग्राम) स्पर्धा घेण्यात येत आहे. जिह्यातील 5 हजार लोकसंख्येवरील पात्र गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत संबंधित तालुक्याच्या उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. जे गाव सर्वात जास्त सौर क्षमता बसवेल त्या गावाची आदर्श सौर ग्राम म्हणून निवड करण्यात येईल. प्रत्येक जिह्यातील अशा गावांना केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
जिह्यात 5 हजार लोकसंख्येवरील 121 गावे असून यामध्ये आजरा तालुक्यातील 2, भुदरगड-2, चंदगड-1 गडहिंग्लज-9, हातकणंगले 35, शिरोळ 24, कागल 10, करवीर-30, पन्हाळा-8, राधानगरी 5, शाहूवाडी 2 याप्रमाणे आहेत. गावे घोषित केल्यानंतर त्याचा कालावधी 6 महिने असेल.
भारत सरकारने 29 फेब्रुवारी 2024 पासून पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला सौर रुफटॉप क्षमतेचा वाटा वाढवण्यासाठी आणि निवासी कुटुंबांना स्वत:ची वीज निर्माण व सक्षम करण्यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार मॉडेल सोलर गाव योजना राबविण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या गावांची स्पर्धात्मक पध्दतीने निवड होईल. या योजनेत गावातील सर्व ग्राहक भाग घेऊ शकतात. तसेच गावाचे सौर मूल्यांकन हे गावातील घर, दुकान, ग्रामपंचायत, शाळा इत्यादींच्या छतावर बसवलेल्या सौर पॅनेलची क्षमता तसेच पीएम कुसुम अंतर्गत जमिनीवर बसवलेले स्मॉल स्केल सोलर पॅनेल (एकाच साईटवर 10 मेगावॅटपेक्षा कमी क्षमतेच्या स्वतंत्र सोलरची क्षमता) यांचा देखील समावेश असणार आहे, असेही शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले.
सोलर रुफटॉप सिस्टीम स्थापित करण्यासाठी सुमारे 4 ते 6 आठवडे लागतात. तथापि, वास्तविक साईटचे काम 1 ते 2 आठवड्यांपर्यंत मर्यादित आहे. सोलर पीव्ही सिस्टीममधून निर्माण होणारी वीज– प्रकल्पाचे स्थान, मॉड्यूलची स्वच्छता अशा घटकांवर जरी वीजनिर्मिती अवलंबून असली तरी नियमानुसार दररोज 4.5 युनिटपर्यंत 1क्sं प्रणालीद्वारे निर्मिती केली जाऊ शकते. सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. सोलर रुफटॉप सबसिडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जमिनीचा 7/12 उतारा, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, विजेचे बिल तसेच ज्या जागेवर सोलार पॅनल बसवायचे आहे त्या जागेचा तपशील. 1क्sं ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर सिस्टीम स्थापित करण्यासाठी सुमारे 10 चौरस मीटर किंवा 120 चौरस फूट क्षेत्र आवश्यक आहे. ग्रिड कनेक्टेड रुफटॉप सोलर (Rऊए) पॉवर प्लांटचे आयुष्य साधारण 25 वर्षे असते.
आवश्यक कागदपत्रे (एजन्सीने करावयाचे)
काम पूर्ण झाल्याचा दाखला, सोलर आयलँडिंग हमी प्रमाणपत्र आणि ग्राहकाचे आधार कार्ड, परिशिष्ट–घ् आणि प्रोफॉर्मा (असूग्म् ण्दहाहू Rल्ग्rिासहू) हमीपत्र, नेट मीटरिंग कनेक्शन करार, पीव्ही मॉड्यूल्स आणि इन्व्हर्टरचे माहितीपत्रक, डेटाशीट.
मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ योजनेची उद्दिष्टे
प्रत्येक जिह्यातील एका गावाचे सौरीकरण करणे. सौर छताच्या वापरास प्रोत्साहन देणे. 247 सौर उर्जेवर चालणारे गाव विकसित करणे. ज्यात त्या गावातील सर्व घरांचा आणि सार्वजनिक क्षेत्रांचा समावेश केला जाईल. ते गाव इतर गावांसाठी एक ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून काम करेल.
केंद्रीय आर्थिक सहाय्य
या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 800 कोटी रुपयांची तरतूद केली असून, प्रत्येक मॉडेल व्हिलेजसाठी 1 कोटी केंद्रीय आर्थिक मदतीची तरतूद आहे.
रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी येणारा खर्च-1 किलोवॅट साठी अंदाजे 70 ते 80 हजार रुपये.








