कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने बांधलेली भव्यदिव्य इमारत पुढची पन्नास वर्षे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या ऐतिहासिक कामाची नोंद घेईल. सध्याच्या कर्तबगार कमिटीमुळे झालेला वडणगे गावातील विकास हा ग्रामविकासाचा आदर्श नमुना असून या इमारतीच्या माध्यमातून गावच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
वडणगे ग्रामपंचायतीने सुमारे पावणे दोन कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन मजली भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा घटस्थापनेच्या मुहुर्तावर पार पडला. यावेळी आ. सतेज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिष्द सदस्य बी. एच. पाटील होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचेही अनावरण करण्यात आले. सरपंच सचिन चौगले हा विकासासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या चिकाटीमुळे गावाला मोठयाप्रमाणात निधी मिळाल्याने अनेक विकासकामे गावात झाली. असंही पाटील म्हणाले.
Previous Articleकोल्हापूर-हुपरी रस्त्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको
Next Article Kolhapur : ‘लोकमान्य’ने भागवली भाविकांची तहान









