कक्कानाड
केरळच्या कक्कानाडमध्ये मंगळवारी रात्री एका जिलेटिन फॅक्टरीच्या भट्टीत स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती हा जिलेटिन फॅक्टरीचा कर्मचारी होता आणि तो मूळचा उत्तर भारतीय होता असे समजते. फॅक्टरीमधील स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संबंधित फॅक्टरीत ड्रग कॅप्सूल कवरची निर्मिती केली जात होती.









