कुपवाड प्रतिनिधी
डेन्मार्क देशातील एका कंपनीतील संशयिताने कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाला कच्चा माल देतो, म्हणून गेल्या अडीच वर्षात ऑनलाईन संपर्काद्वारे पैसे उकळून तब्बल १४ लाख ६७ हजार ८९७ रुपयाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कंपनीसाठी लागणारा ‘पीव्हीसी रिग्रॅड’ नावाचा कच्चा माल देतो, असे सांगून पैसे देवूनही माल न पाठविल्याने परदेशी कंपनीने फसविल्याची तक्रार संबंधित उद्योजकाने कुपवाड पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कुपवाड एमआयडीसीतील प्रकाश शांतीलाल शहा (रा.अंबाईनगर, काॅलेज काॅर्नर जवळ, सांगली) असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संशयित पाॅल राॅबसन (रा.जीजीपी, डेन्मार्क) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








