प्रतिनिधी /वास्को
वास्को दाबोळी येथील वयोवृध्द नागरिक सिराज अमजीद सराफ(76) हे मागच्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबाने वास्को पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे.
पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार सिराज अमजीद सराफ हे दि. 23 पासून दाबोळीतील राहत्या घरातूनच गायब झालेले आहेत. वृध्दावस्थामुळे ते कुठे तरी भरकटले असण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी विविध ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत असून सदर बेपत्ता व्यक्ती कुठेही आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्थानकात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.









