जम्मू :
बीएसएफने रविवारी जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. यादरम्यान जवानांनी शस्त्रास्त्र तसेच दारूगोळा हस्तगत केला आहे. शनिवारी रात्री उशिरा सीमा ओलांडू पाहणाऱ्या घुसखोराच्या हालचाली बीएसएफ जवानांनी टिपल्या होत्या. जवानांनी लाइट मशीनगगने गोळीबार केल्याने दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रs तेथेच टाकून पळ काढला आहे. तर रविवारी सकाळी शोध घेतला असता एके असॉल्ट रायफल, दोन मॅगजीन, दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आले.









