कंग्राळी खुर्द येथील हुतात्म्यांना अभिवादनसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
1956 सालापासून गेली 66 वर्षे आम्ही मराठी भाषिक मराठी भाषा शिकविण्यासाठी लढा देत आहोत. या लढ्यामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मंगळवार दि. 17 रोजी कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथून शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून आपला मराठी स्वाभिमान जागविण्याचे आवाहन बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी केले.
बैठकीला मल्लाप्पा पाटील, सदानंद चव्हाण, राजकुमार पाटील, शंकर कोनेरी, रवी कोनेरी, सुनील पाटील, शिवा कोळी, शंकर पाटील, अरुण पाटील, आनंद पाटील, रमेश पाटील, संजय कोलते, कल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा पाटील, योगेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हुतात्मा दिन मार्गदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.









