प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तपासनाक्यांवर वाहनांची तपासणी सुरूच ठेवण्यात आली आहे. शनिवारी अथणी येथे एका बसप्रवाशाकडून 2 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अथणी येथील छत्रपती शिवाजी सर्कलजवळ एक बस अडवून एफएसटी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अथणी येथील शिवानंद बुरुड या प्रवाशाजवळ 2 लाख रुपये आढळून आले. यासंबंधी कसलीच कागदपत्रे नसल्याने ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









