वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मुंबईचा अष्टपैलू मुशिर खानच्या शानदार कामगिरीच्या जोरावर विजयवाडा येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरूषांच्या चौरंगी वनडे मालिकेतील सामन्यात भारताच्या 19 वर्षाखालील अ गटाने बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला. तर या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 3 गड्यांनी हार पत्करावी लागली होती.
भारत अ आणि बांगलादेश ब यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने 50 षटकात 5 बाद 317 धावा जमविल्या. आदर्श सिंगने 92 तर मुशिर खानने 70 तर मोलियाने नाबाद 65 धावांची खेळी केली. त्यानंतर बांगलादेशचा डाव 47.2 षटकात 225 धावात आटोपला. भारतातर्फे मुशिर खानने 31 धावात 4 गडी बाद केले.









