संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी 2 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. संसद हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार असल्यामुळे सर्वपक्षीय बैठक शनिवार, 2 डिसेंबर रोजी घेण्याचे नियोजन संसदीय व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. रविवार, 3 डिसेंबर रोजी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. लोकसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये कोण अधिक आक्रमक भूमिका घेते हे निवडणुकीचे निकाल ठरवतील.









