ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने मनरेगासाठी सुमारे 25,000 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मागितली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली असून यावरून कामांची मागणी वाढल्याचे स्पष्ट केले आहे. या महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात वाटप करणे अपेक्षित असल्याचेही नमूद केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) 73,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी सुमारे 54,000 कोटी रुपये आतापर्यंत राज्यांना देण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात मनरेगावरील एकूण खर्च 98,000 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो.









