पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार; रिकाम्या इमारतीकडे महापालिकेचेही अक्षम्य दुर्लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथील जुन्या शहर पुरवठा कार्यालयाच्या रिकाम्या इमारतीत बेवारस रेशनकार्ड आढळली आहेत. विशेष म्हणजे या इमारतीमधून हे कार्यालय कसबा बावडा रोडवरील प्रशासकिय इमारतीमध्ये स्थलांतर होऊन जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. तरीही या जुन्या इमारतीमध्ये इतकी रेशनकार्डे कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावऊन पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तर ही इमारत महापालिकेच्या मालकीची असून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. कारण या ठिकाणी ओपनबारसह लघुशंकेसाठीही सर्रास वापर सुऊ आहे.
मिरजकर तिकटी परिसरातील खासबाग मैदानाला लागून असलेली ही इमारत महापालिकेच्या मालकीची आहे. या इमारतीमध्ये शहर पुरवठा कार्यालय भाड्याने सुऊ होते. परंतु जवळपास नऊ वर्षापूर्वी येथील शहर पुरवठा कार्यालय नवीन प्रशासकिय इमारत येथे स्थलांतरीत झाले. त्यानंतर ही इमारत पुर्ववत महापालिकेच्या ताब्यात आली. परंतु त्याचा वापर किंवा दुऊस्ती करण्यात आली नाही. परिणामी या इमारतीचा वापर दिवसा लघुशंकेसाठी व रात्री तळीरामांच्या ओपनबारसाठी होऊ लागला आहे. यामुळे येथे प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून दाऊच्या बाटल्यांचा खचही पडल्याचे दिसत आहे. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे बेवारस रेशनकार्ड मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पडल्याचे समोर आले आहे. जर नऊ वर्षापूर्वी पुरवठा कार्यालय येथून स्थलांतरीत झाले तर मग ही रेशनकार्ड येथे कशी ? ती कोणाची आहेत ? असे प्रश्न उपस्थित होत आहे. यावऊन पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ही रेशनकार्ड कोणाची व येथे का याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तर महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे यां इमारतीला मरणकळा आल्याचे चित्र आहे.