नवी दिल्ली
दूध, दही तसेच आईस्क्रीमच्या क्षेत्रात नावाजलेली कंपनी अमुल आता गव्हाच्या पीठाच्या क्षेत्रात उतरली आहे. कंपनीने सेंद्रीय खाद्य पदार्थातही आपली उत्पादने सादर करण्याचे निश्चित केले आहे. अमुल ऑर्गेनिक होल व्हीट आटा म्हणजेच गव्हाचे पीठ विक्रीला उपलब्ध करणार आहे. याशिवाय कंपनी मूग डाळ, चणा डाळ, बासमती तांदूळसारखी उत्पादनेही सादर करणार आहे.









