प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित’च्या अमृतधन मुदत ठेव व धनसागर रिकरिंग ठेव या दोन्ही योजनांना मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहून ठेवीदारांची निराशा टाळण्यासाठी दोन्ही योजनांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतील. त्यांच्यासाठी ही एक आनंदवार्ता असून या वाढीव मुदतीचा त्यांना लाभ घेता येईल.
अमृतधन योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना एक लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यात सव्वालाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक रुपये 10 हजार व पुढील पटीत करता येईल. धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दर महिन्याला किमान 600 रुपये पाच वर्षे तीन महिने भरल्यास 50 हजार रुपयांचा परतावा मिळेल. अधिक माहितीसाठी ‘तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित’, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन क्र. 0831-2424777 किंवा मोबाईल क्र. 9108540877 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









