30 नोव्हेंबरपर्यंत योजनेत गुंतवणूक करता येणार
बेळगाव : तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमिततर्फे दिवाळीचे औचित्य साधून धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर अमृतधन मुदत ठेव योजना व धनसागर रिकरिंग ठेव योजना सुरू करण्यात येत आहेत. 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये या योजनेत गुंतवणूक करता येईल. अमृतधन या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना एका लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यात सव्वा लाख रुपयांचा परतावा मिळेल. किमान गुंतवणूक रुपये 10,000 व त्या पटीत करता येईल. याचप्रमाणे धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दर महिन्याला किमान 600 रुपये 5 वर्षे 3 महिनेपर्यंत भरल्यास 50,000 रुपये परतावा मिळेल. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर या योजनांचा शुभारंभ होत असून अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित, 3524, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









