Amrita Fadnavis महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार एका ‘डिझायनर’ विरोधात असून गुन्हेगारी खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी पैसे देऊ केल्याचा आरोप या तक्रीरीत केला आहे. या संबंधीची माहीती मलबार हिल पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. अमृता पडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून, अनिक्षा नावाची महिला डिजायनर नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा भेटली होती. गेल्या 16 महिन्यांपासून ती अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. ती फडणवीस यांच्या घरीही गेली होती.
ओळख वाढल्यानेतर अनिक्शाने ती एक डिजायनर असल्याचे सांगून कपडे, दागिने आणि पादत्राणे यांचे डिझायन करते. त्यानंतरह त्या महिलेने आपल्या काही डिजाईन केलेले कपडे अमृता फडणवीस यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परिधान करण्याची विनंती केली ज्यामुळे तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यास मदत होईल असे सांगितले. अनिक्षा विषयी अधिक माहिती सांगताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, त्या महिलेने अमृता फडणवीस यांना तिला आई नसून ती तिच्या कुटुंबाची आर्थिक काळजी घेत असल्याचे सांगितले होते.
अमृता पडणवीस यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, अनिक्षाने तिला काही बुकींची माहिती देण्याचे सांगून त्यातून आपण खूप पैसे कमावू अशा दावा केला. या महितीच्या बदल्यात तिला 1 करोड रुपयांची ऑफर करण्याचा प्रयत्न केला. असे स्पष्टीकरण दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








