वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंडेनबर्ग कंपनीच्या आरोपांच्या नंतर स्वीस बँकेने अदानी उद्योकसमूहाची 2 हजार 600 कोटी रुपयांची रक्कम गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. काही आठवड्यांपूर्वी हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्टसेलिंग कंपनीने सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच यांच्यावर अदानी उद्योगसमूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला अनुलक्षून हा निर्णय घेतल्याचे स्वीस बँकेने स्पष्ट केले आहे. अदानी यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचा प्रतिवार केला असून हिंडेनबर्ग कडून अदानी उद्योगसमूहाची पत घसरविण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली आहे. हिंडेनबर्गच्या दुसऱ्या आरोपांना शेअरबाजारानेही फारशी किंमत दिलेली नसल्याचे बाजाराच्या हालचालींवरुन दिसून आले होते.









