उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचे प्रयत्नांना यश
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली पंचक्रोशीत गव्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अलिकडेच वर्षभरात बागायती तसेच भात शेतीमध्ये गव्यांनी मोठ्या प्रमाणात हौदोस घालून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते . न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे.आतापर्यंत एक लाखाहून अधिक रक्कमेची नुकसानभरपाई पार्सेकर यांनी येथील शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. न्हावेली गावात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.शेती बागायतीमध्ये गव्याकडून तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून मोठी नासधूस केली जाते.पावसाळ्यात गावातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात गव्यांकडून नुकसानी सुरुच असते.शेतकऱ्यांची झालेले नुकसान लक्षात घेता यावेळी उपसरपंच श्री.पार्सेकर यांनी वनविभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून आवश्यक ती पूर्ववत कागदपत्रे वनविभागाच्या दप्तरी केली होती.शेतकऱ्यांच्या सातबाराच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यापर्यत पार्सेकर यांनी प्रयत्न केले होते.त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आतापर्यंत त्यांनी १३ शेतकऱ्यांना तब्बल एक लाखाहून अधिक रक्कम नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असून न्हावेलीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पार्सेकर यांचे आभार मानले आहेत.









