भारताच्या मुख्य भागीदारांचा समावेश :देशाच्या एकूण आयातीत 12.2 टक्क्यांनी घट
नवी दिल्ली
भारताच्या मुख्य 10 आयातीमधील भागीदारांपैकी केवळ रशिया आणि हाँगकाँगने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आयातीत समधानकारक वाढ नोंदवली आहे. कमकुवत मागणी आणि वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्यामुळे देशाच्या एकूण आयातीत 12.2 टक्क्यांनी घट झाली आहे अशा वेळी ही विशेषबाब दिसून येत असल्याची माहिती आहे.
वाणिज्य विभागाने संकलित केलेल्या डाटावरून असे दिसून आले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत रशियामधून आयात सुमारे दोन तृतीयांश वाढून 30.4 अब्ज डॉलर झाली आहे. यासह रशिया चीननंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात भागीदार बनला आहे. सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक देशांसाठी व्यापार डाटा उपलब्ध नसला तरी, पहिल्या पाच महिन्यांतील ट्रेंड सतत वाढ दर्शवतात. हे प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या आयातीमुळे दिसून येते. जोपर्यंत हाँगकाँगचा संबंध आहे, आयातीतील वाढ 2.6 टक्के होती. एकूण 10.2 अब्ज डॉलर राहिला.
योगदान 59 टक्क्यांहून अधिक आहे. एकूण आयातीत सलग नवव्या महिन्यात घट दिसून आली आहे. पहिल्या सहामाहीत आकुंचन कमकुवत स्थानिक मागणी आणि जागतिक वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे होते. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ञ अदिती गुप्ता यांच्या मते, देशांतर्गत मागणी दर्शविणारी सोन्याची आयात कमजोर राहिली आहे. गेल्या वर्षी नोंदवलेल्या 35.7 टक्के वाढीच्या तुलनेत 10 टक्के घट झाली आहे.
पहिल्या पाच महिन्यात प्रामुख्याने विद्युत यंत्रांच्या आयातीमुळे ही वाढ झाली. भारताच्या प्रमुख 10 आयात भागीदारांमधील आयात खालीलप्रमाणे…
देश आयात टक्केवारीत
? चीन 3.71 टक्के
? यूएस 17.06 टक्के
? यूएई 25.51 टक्के
? इराक 31.26 टक्के -31.25 टक्के
? इंडोनेशिया 33.43 टक्के
? सिंगापूर 6.51 टक्के
? दक्षिण कोरिया 8.03 टक्के
भारताच्या एकूण व्यापारी मालाच्या आयातीत हे देश योगदान देतात.









