कारगिल मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती क्लबला सर्व साधारण विजेतेपद
बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित कारगिल मॅरेथॉन स्पर्धेत स्नेहा भोसले, आकांक्षा गणेबैलकर, अमोल अमुने पंढरपुर, प्रतिक्षा कुरबुर, राहुल सुर्यवंशी पंढरपुर, कल्लप्पा तिर्विरकर यांनी विजेतेपद पटकाविले. ज्योती क्लबने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. लेले मैदानावर आयोजित मॅरेथॉनचे उद्घाटन बेळगावचे पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, माजी महापौर नागेश सातेरी यांच्या हस्ते ध्वज उंचावुन करण्यात आले. 42 किलोमीटर फुल, 21 किलोमीटर हाफ, 10 किलोमीटर, त्याचबरोबर 3 कि.मी. फनरण आणि विकलांगांची मॅरेथॉन सुरूवात करण्यात आली. या मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरची विजेती स्नेहा भोसले हिने प्रथम क्रमांक, प्राजक्ता मरगाळेने दुसरा क्रमांक पटकावला, 21 किलोमीटर आकांक्षा गणेबैलकर हिने प्रथम क्रमांक, मीनाक्षी बरुकरने दुसरा क्रमांक पटकावला. 21 किलोमीटर पुरुषांमध्ये अमोल पंढरपूर याने प्रथम क्रमांक, सुरेश बळकुडीने दुसरा क्रमांक, आकाश देसूरकर तृतीय क्रमांक तर 10 किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा कुंभार, द्वितीय क्रमांक पूजा हलगेकर, तृतीय क्रमांक सौंदर्य हलगेकर, मुलांमध्ये 10 किलोमीटर राहुल सूर्यवंशी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक भूषण गुरव, तृतीय क्रमांक अल्लारक नदाफ तसेच 35 वयोगटावरील 21 किलोमीटर कल्लाप्पा तिरर्विकर यांनी पटकाविला. विकलांगांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक लक्ष्मी रायण्णावर, व्दितीय क्रमांक फकिरा करवीकुपा, तृतीय क्रमांक सिध्दाप्पा पटगुडी विजेतेपद मिळविले.
विजेत्या स्पर्धकाना सचिन गोरले, बंडू केरवाडकर, वेद आणि मुजावर यांच्या हस्ते चषक, पदके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई, सेक्रेटरी रवी बिर्जे, संचालिका राजश्री तुडयेकर, दामोदर कंबरकर, विनोद गुरव, महादेव पाटील, कल्लापा पाटील, राजेश तुडयेकर आधी उपस्थित होते. या स्पर्धेच्यावेळी स्पर्धेचे मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक वसंत गोखले व बाळासाहेब कातके, उमेश थोपटे, अंकुश गुहे, लक्ष्मण कोलेकर आणि अकिल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्यावेळी विजय हॉस्पिटल आणि शिवसेनेचे अॅम्ब्युलन्स सेवा दिली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावंगावच्या कल्लाप्पा पाटील यांनी भवानीनगर मंडोळी ग्रामस्थ बेनाळी ग्रामस्थ सावगाव ग्रामस्थ मंडळींनी कार्यकर्तानी सहकार्य केले. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. बीएससी मॉलचे संचालक वेद, जमादार आणि रामांना यांनी अडीच हजार टी-शर्ट पुरुस्कृत केली.









