पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
ओटवणे प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या आंबोली मंडळ उपाध्यक्षपदी अमोल अर्जुन सावंत यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अमोल सावंत यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आलेआहे .
यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला यश संपादन करून देण्यासाठी श्री. सावंत यांच्यासह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित आंबोली मंडळ उपाध्यक्ष अमोल सावंत यांनी आंबोली मंडळात पक्ष बांधणीसह आगामी निवडणुकांत शतप्रतिशत भाजपचं उद्दीष्ट घेऊन कार्यरत राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिली.
यावेळी भाजपचे माजी आंबोली मंडळ अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी अमोल सावंत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवसू भाजपा बूथ अध्यक्ष अशोक सावंत, दाणोली बूथ अध्यक्ष प्रभाकर सावंत, देवसू ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









