Mahavikasaghadi Mahamorcha Mumbai :शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. या मोर्चानंतर मविआचा आजचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा होता,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यानंतर आता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी ट्विट करत काय म्हणाले,
देवेंद्रजी महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा एकंदरीत पॉवरफुल झालाय. त्याचा ड्रोन शॉट एकदा वेळेनुसार बघुन घ्याल. तुमचा जळफळाट आम्हीं समजु शकतो.cool down असे म्हणत मिटकरींनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मिटकरींनी व्हिडिओ शेअर करत फडणवीसांना टॅग केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या टीकेला फडणवीस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









