MP Amol Kolhe And Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं आहे. जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची राजाराम साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाली आहे.यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी प्रतीक पाटील यांनाही लोकसभेत पाठवा असं आवाहनही केलं आहे. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांचे कौतुक केले.
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असून ते लवकरच वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वीही ज्या-ज्यावेळी पवारांनी भाकरी फिरवायला हवी, असं वक्तव्य केलं आहे, त्या-त्यावेळी त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटल्याचे पाहायला मिळाले आहेत.दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
अमोल कोल्हे म्हणाले की, राजकारणात अशी काही लोक आहेत जी बस म्हटल की बसतो. उठं म्हटलं की उठतो यापैकी एक म्हणजे जयंत पाटील आहेत. छत्रपती संभाजी या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान जयंत पाटील यांच्याशी अनेकदा भेट झाली कधी घरी, कधी ऑफिसमध्ये यावेळी एक जाणवलं की, राजकारणात इतकी वर्ष सातत्य असणारा माणूस कुटुंबालाही तेवढाच वेळ देतो. त्यांची दोन्ही मुलेही खूपच संस्कारी,सुसंस्कृत आहेत.पित्याच्या कष्टाचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवा नेतृत्त्व म्हणून प्रतिक पाटील यांच्याकडे आज पाहावंस वाटतं, म्हणूनच प्रतीक पाटील यांना लोकसभेत पाठवा अस आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.
Previous Articleशहर सौदर्यीकरणात वेंगुर्ले न. प. प्रथम आल्याबद्दल मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा सत्कार !
Next Article न्हावेली येथे २ मे रोजी गोंधळ उत्सव !








