Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडल्यावर राजकारण पेटले आहे. टोल नाका फोडण म्हणजे राजकारण नाही.कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा अशी टीका भाजपानं केली होती.त्यावर मनसेकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. हा फक्त ट्रेलर होता, वेळ आली तर पिक्चर पण दाखवू असा मजकूर लिहित टोल फोडणाऱ्यांचे अभिनंदन अशी होर्डिगबाजी नाशिकमध्य़े करण्यात आली.
अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. काही दिवसापूर्वी समृध्दी महामार्गावरील ठाकरे यांचे वाहन अर्धा तास रोखल्याच्या कारणावरून संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतर नाशिकमध्ये लागलेले होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहेत. या सगळ्यांवर अमित ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र टोलमुक्तीच्या आश्वासनाच काय झाल- राज ठाकरे
मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केल्यानंतर भाजपन अमित ठाकरे यांच्यावर टीका केली. दादागिरी राज्यात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भाजपन दिला. यावरून पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणांवर भाष्य करत भाजपवर टीका केलीय. भाजपानं निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र टोलमुक्त करू अस आश्वासन दिलं होत त्याच काय झाल असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रत्येकवेळी टोलची कंत्राटं म्हैसकर नावाच्या माणसालाच का दिली जातात ? हा कोणाचा लाडका आहे, टोलची नेमकी प्रकरण काय आहेत असा सवालही राज ठाकरे यांनी केला. रस्त्यावर खड्डे पडले आहेत टोल कसले घेताय? टोल कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. समृध्दी महामार्गावर झालेल्या मृत्यूंना सरकार जबाबदार नाही का असा सवालही यावेळी त्यांनी केला.