डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये कार्यक्रम
पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी गोव्यात येत असून त्यांच्या भेटीची तयारी जवळजवळ पूर्णत्वास आली आहे. सोमवारी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत या सभेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सभेसाठी लोकांची सर्वाधिक उपस्थिती लाभावी यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. त्यासंबंधी आमदार, पदाधिकारी यांना जबाबदाऱ्याही वाटून देण्यात आल्या. आज बुधवारी दिवसभरात स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत या तयारीचा आढावा घेऊन अंतिम स्वऊप देणार आहेत. शनिवार दि. 4 रोजी सायंकाळी 4 वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लाभार्थींसाठी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार असून प्रत्येक पंचायतीमधून कदंब बसची सोय करण्यात आली आहे. त्यांना अल्पोपहारही पुरविण्यात येणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
या प्रकल्पाची उद्घाटने, पायाभरणी
- गोवादंतमहाविद्यालयाची नवी इमारत उद्घाटन
- कांपालस्मार्टसिटी स्टेडियम उद्घाटन
- जुन्ताहाऊसच्यानव्या इमारतीची पायाभरणी
- महत्त्वाकांक्षीप्रकल्प‘प्रशासन स्तंभ’ची पायाभरणी
- एनबीसीसीच्याप्रकल्पांचीपायाभरणी
- ‘माझेघर’ ऐतिहासिकयोजनेचा शुभारंभ
- गोवावमेढवी विद्यापीठ यांच्यात समन्वय करार
- तब्बल18 प्रकल्पांचीव्हर्च्युअली पायाभरणी









