बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांचे कर्नाटकातील दौरे वाढले असून २७ आणि २८ रोजी ते पुन्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते हुबळी आणि बेळगावला भेट देणार आहेत. महिनाभरात त्यांचा हा दुसरा दौरा आहे.
२८ रोजी ते कित्तूर मतदारसंघाला भेट देतील. यावेळी प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्याबरोबर बेळगाव येथे जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे.
एम के हुबळी येथेही असेच कार्यक्रम आखण्यात आले असून ज्या ठिकाणी अमित शहा उपस्थित राहणार आहेत, त्याठिकाणच्या परिसराची पाहणी कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी केली आहे.
डिसेंबरच्या अखेरीस राज्याच्या दौर्यादरम्यान त्यांनी बेंगळूर, मंड्या आणि बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यांचा दौरा केला होता.