Amit Shah Kolhapur Visit : भाजप नेते केंद्रीय गृह मंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, ते येथून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रवाना झाले आहेत. त्याच्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दिपक केसरकर, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.
अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहरात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी हलगी आणि घुमक्याच्या गजरात त्यांचे स्वागत केले. शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू नये याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ अजित पवारांना घेऊन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांना घेऊन ते मुश्रीफांच्या भेटीला जाणार आहेत.या भेटीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत सर्व ती माहिती देऊन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करणार असल्याचे, त्यांनी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर बॅंकेतील कथित घोटाळा आणि ईडीच्या कारवाईमुळे भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यामध्ये बोलताना अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये सोलापूर,नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागल्याचा उल्लेख केला आहे.कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमला होता,या संदर्भाने त्यांचे ते वक्तव्य असावे,असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








