बेळगाव : अनगोळ येथील मातोश्री व्यायामशाळे तर्फे 26 जानेवारीला झालेल्या मिस्टर मातोश्री टॉप 12 शरिरसौष्ठव स्पर्धेत अमित सावंतने आपला पिळदार शरीराच्या जोरावर मि. मातोश्री हा किताब फटकाविला. आदित्य तमान्नाचेने उत्कृष्ट पोजर बहुमान मिळवला. या शरिरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 40 हुन अधिक शरिरसौष्ठव पटूंनी भाग घेतला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
टॉप 12 निकाल पुढीलप्रमाणे 1) अमित सावंत, 2) वजीर खान,3) सागर सांबरेकर, 4) महांतेश, 5) नसीम खान, 6) आदित्य तमान्नाचे, 7) अमर काकती, 8) रोहित सुतार, 9) राज बाबले, 10) मुस्तू दुदनकावर, 11) प्रथमेश चौगुले, 12) राहुल शिंदोळकर
यांनी विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे दिनेश देसाई, मुन्ना दलाल, समीर पठाण, वसीम, स्नेहल देसाई, कल्पना देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदके, चषक व प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मातोश्री जिमच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









