40 वर्षात बेळगावला प्रथमच पद
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या वार्षिक सर्व साधारण बैठक व नूतन कार्यकारणीच्या बैठकीत बेळगावच्या अमित पाटील यांची कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रथमच वर्णी लागली आहे. तर आमदाय एन. ए. हॅरिस यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. बेंगलोर येथील कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या फुटबॉल मैदानाच्या नूतन सभागृहात कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेची सर्व साधारण सभा व नूतन कार्यकारणीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सचिव एम. कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागिल वर्षाचा आढावा घेतला. त्याला सर्व सभासदांनी अनुमोदन दिले. या बैठकीत माजी सचिव एम. सत्यनारायण यांची नियुक्ती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे नूतन कार्यकारी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष आम. एन. ए. हॅरिस, उपाध्यक्ष एफ. सी. शकिल, अब्दुल रेहमान, बी. कमल, जी. आर. संजय म्हैसूर, अमित पाटील बेळगाव यांची निवड करण्यात आली आहे. जनरल सेक्रेटरीपदी एम. कुमार, उपसचिवपदी हनिफ महम्मद, अस्लम अहमद खान व सर्वानन धर्मन तर खजिनदारपदी व्ही. के. मंजुराज यांची निवड करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या कार्यकारिणीत 40 वर्षानंतर प्रथमच बेळगावच्या सभासदाची वर्णी लागली आहे. या निवडीनंतर कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष एन. ए. हॅरिस यानी सर्वांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नूतन कार्यकारिणीला कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.









