सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रोज कोणत्या ना कोणत्या वेगळ्या घटना समोर येत आहेत. कालपासून अभिनेते शरद पोक्षे यांच्या एकनाथ शिंदे पोस्टवरुन नवीन वादाला सुरुवात झाली असतानाच आता अमेय खोपकर यांनी ट्विट केले आहे. राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय अशी टीका त्यांनी केली आहे.
याशिवाय अमेय खोपकर यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “धर्मवीर आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
हेही वाचा- शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही; आदेश बांदेकरांच्या पोस्टवर सडेतोड उत्तर
अमेय खोपकरांनी नेमके काय ट्विट केले आहे
अमेय खोपकर यांनी दोन पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी धर्मवीर चित्रपटातील सीन शेअर केला आहे. ज्यात आनंद दिघे रुग्णालयात असताना राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेलेले असतानाचा संवाद दाखवला आहे. जो चित्रपटगृहात आणि झी ५ वर दाखवताना त्यातील महत्त्वाचा संवाद कट केला आहे. असे दोन व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत. ”अहो धर्मवीर अजून हिंदुत्वाचं काम सर्वत्र पोहोचलेलं नाही.” यावर आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात, ”ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे.” हे व्हिडीओ शेअर करत अमेय खोकपकर म्हणाले, ”खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. धर्मवीर जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









