वृत्तसंस्था/ अॅटलांटा (अमेरिका)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या 250 दर्जाच्या पुरुषांच्या अॅटलांटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर फ्रिझने एकेरीचे जेतेपद पटकाविताना ऑस्ट्रेलियाच्या व्ह्यूकीकचा पराभव केला. चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील फ्रिझचे एटीपी टूरवरील हे दुसरे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्या फ्रिझने व्ह्यूकीकचा 7-5, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव केला. हा सामना दोन तास चालला होता. या स्पर्धेतील जेतेपदामुळे आता टेलर फ्रिझ एटीपीच्या ताजा मानांकनात 9 व्या स्थानावर झेप घेईल.









