वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रविवारी येथे झालेल्या वॉशिंग्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 19 वर्षीय कोको गॉफने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. हार्डकोर्टवरील स्पर्धेतील तिचे हे पहिले विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात गॉफने ग्रीसच्या मारीया सॅकेरीचा 6-2, 6-3 असा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील गॉफचे हे चौथे विजेतेपद आहे. तिने 2019 साली लिंझ स्पर्धेत, 2021 साली पॅरमा स्पर्धेत तर गेल्या जानेवारीत ऑकलंड स्पर्धेत अजिंक्यपदे मिळविली होती. हा अंतिम सामना 84 मिनिटे चालला होता.









