अमेरिकेची हवाई सुरक्षा यंत्रणा : ट्रम्प-एमबीएस यांना सतावतेय इराणची भीती
वृत्तसंस्था/ रियाध
सौदी अरेबियात अमेरिकच्या ‘थाड’ हवाई सुरक्षा यंत्रणेला तैनात करण्यात आले आहे. सौदी अरेबियाच्या सैन्याच्या एका युनिटने अमेरिकेच्या सैन्याच्या फोर्ट ब्लिस तळावर थाड एंटी-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण मिळविले आहे. या प्रशिक्षणामुळे सौदी सैन्याला जगातील सर्वात अत्याधुनिक संरक्षण प्रणालींपैकी एक थाडचे संचालन करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. इराण आणि इस्रायलमध्येझालेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव असताना सौदी अरेबियाने स्वत:च्या क्षेपणास्त्र सुरक्षा क्षमतेत भर टाकली आहे.
थाड प्रणाली सौदी अरेबियात पूर्वीपासून संचालित पॅट्रियट पीएसी-3 प्रणालींच्या निम्न-उंच क्षमतांना पुरक आहे. अमेरिका दीर्घकाळापासून आखातातील सहकाऱ्यांना प्रगत शस्त्रास्त्रs पुरवत आहे. जुलै महिन्यात सौदी अरेबियाला थाड यंत्रणेची पहिली बॅटरी प्राप्त झाली होती. मे महिन्यात अमेरिकेच्या विदेश विभागाने 3.5 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात सौदी अरेबियाला एआयएम-120सी-8 अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (एएमआरएएएम) विक्रीला मंजुरी दिली होती.
सौदी अरेबियाला इराणच्या वाढत्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांमुळे सुरक्षा आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशास्थितीत सौदी अरेबियासाठी थाड प्रणाली प्राप्त करणे आणि त्याचे संचालन करणे महत्त्वाचे ठरले आहे.
का खास आहे ही प्रणाली?
अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (थाड) प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली उ•ाणच्या अंतिम टप्प्यादरम्यान छोट्या, मध्यम अणि दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एका बॅटरीत सर्वसाधारणपणे 6 ते 9 लाँचर असतात. यात 8 इंटरसेप्टर, एक एएन/टीपीव्ही-2 एक्स-बँड रडार आणि फायर कंट्रोल सिस्टीम असते.
थाड प्रणाली 200 किलोमीटरपर्यंतचे अंतर आणि 150 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर बाह्य-वायुमंडळीय क्षेत्रात धोक्याला रोखण्याची क्षमता प्रदान करते. या क्षमतेमुळे ही प्रणाली अत्याधुनिक क्षेपणास्त्र धोक्यांना निष्प्रभ करण्यास सक्षम ठरते. यात वेगळे होणारे वॉरहेड किंवा डिकॉयने युक्त क्षेपणास्त्रs सामील आहेत. या प्रणालीची उच्च हिट-टू-किल क्षमता याला अत्यंत मजबूत स्वरुप मिळवून देते









