वृत्तसंस्था / टोरँटो (कॅनडा)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या नॅशनल बँक खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत बेन शेल्टनने इटलीच्या कोबोलीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
अमेरिकेच्या शेल्टनने कोबोलीचा 6-4, 4-6, 7-6 (7-1) असा फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. शेल्टनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या नवव्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. मिनॉरने अमेरिकेच्या सातव्या मानांकीत टायफोवर 6-2, 4-6, 6-4 तसेच रशियाच्या सहाव्या मानांकीत आंद्रे रुबलेवने स्पेनच्या फोकिनाचा 6-7 (3-7), 7-6 (7-2), 3-0 असा पराभव केला. या सामन्यात खेळताना फोकीनाने दमछाक झाल्याने स्पर्धेतून माघार घेतली.









